मोदी-शहांच्या पाठीवर आडवाणींकडून अभिंदनाची थाप, म्हणाले…

9

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप निर्भेळ यश मिळवण्याच्या उबरठ्यावर आहे. तर एनडीए आतापर्यंत 343 जागांवर आघाडीवर आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या पाठीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी कौतुकाची थाप दिली आहे.

लालकृष्ण आडवाणी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व विजयाबाबत आणि भाजपला आणखी पुढे नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. भाजप अध्यक्ष आणि सर्व भाजप कार्यकर्ते यांनी पक्षाचे मत सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्यास प्रयत्न केले. तसेच आडवाणी पुढे म्हणाले की, हिंदुस्थानसारख्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या या देशात निवडणूक प्रक्रिया अडथळाविना पार पडली हा एक मोठा आनंदी अनुभव आहे. यासाठी मतदार आणि सर्व संस्थांचे आभार. यावेळी आडवाणी यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्य़ासाठी शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या