LDF आणि UDF समर्थक भिडले; झेंड्याच्या काठ्यांनी एकमेकांची डोकी फोडली

71
kerala-ldf-udf-fight-on-road

सामना ऑनलाईन । कोल्लम

lok sabha election 2019 निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडणार आहे. या टप्प्यासाठी रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सारेच पक्ष शक्ती प्रदर्शन करत होते. अशातच केरळमध्ये दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोड-शो दरम्यान हाणामारी झाली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील झेंड्याच्या काठीनेच एकमेकांमा बडवण्यास सुरुवात केली. या पक्षांनी घातलेल्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील पुयाप्पल्ली येथे LDF आणि UDF अशा दोन पक्षांचा रविवारी रोड शो सुरू होता. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठीचा हा शेवटचा दिवस असल्याने प्रचार शिगेला पोहोचला होता. त्या दरम्यान, LDF आणि UDF चे समर्थक एकमेकांसमोर आले. त्यांच्यातील बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही पक्षांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले. त्यांनी आपल्या हातातील झेड्यांनी एकमेकांना झोडून काढले. या हाणामारीत काही जणांची डोकी फुटली. ही घटना घडली तेव्हा अवघे दोन ते तीन पोलीस तेथे उपस्थित असल्याचे या व्हिडिओत दिसत आहेत. दरम्यान, काही वेळातच पोलिसांनी परिसराचा ताबा घेतला आणि वातावरणातील तणाव हळूहळू निवळला.

 

आपली प्रतिक्रिया द्या