दोन टप्प्यात झालेल्या मतदानानंतर काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली, मोदींचा मोठा दावा

1

सामना ऑनलाईन । पिंपळगाव (नाशिक)

 • आज दुसरा कोणता उमेदवार एवढा मजबूत दिसतो का?
 • मजबूत देशासाठी मजबूत सरकार पाहिजे, मजबूत पंतप्रधान पाहिजे
 • एचएएलला तोट्यात काँग्रेसने टाकलं, आम्ही तर एचएएल सोबत डिफेन्स क्षेत्राला विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत
 • लोकांना खोटं सांगून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे
 • मोदी सरकारने दलालांचे राज्य संपवले
 • काँग्रेसचा डाव सांगतो, कांदा-टोमॅटोचा दर वाढला की महिलांना विचारायचे आणि दर पडला की शेतकऱ्यांना विचारायचे मात्र दलालांचे काय? हे दलाल काँग्रेसचे होते
 • कांदा निर्यातीसंदर्भात मला तुमच्या खासदार आमदारांनी सूचना केल्या होत्या, त्यासर्व मी लागू केल्या
 • एकसाथ कांद्याला मार्केट देण्याची परंपरा आपल्याकडे होती
 • 23 मे नंतर मोदी सरकार येईल त्यानंतर पंतप्रधान किसान योजनेच्या सध्या असलेल्या अटी देखील शिथील करण्यात येतील
 • आदीवासी आणि शेतकऱ्यांसाठी बीज ते बाजार असा सेतू निर्माण केला आहे
 • आदीवासी विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत
 • देशातील व्यापार वाढावा, गुंतवणूक वाढावी यासाठी सर्व प्रयत्न सरकार करत आहे
 • त्याला देखील जवान चोख प्रत्युत्तर देत नष्ट करत आहेत
 • त्यामुळे दहशतवाद आता फक्त जम्मू-कश्मीरच्या काही भागात उरला आहे
 • कारण आम्ही दहशतवाद्यांच्या फॅक्टरीत घुसून त्यांना धडा शिकवला
 • श्रीलंकेत बॉम्बस्फोट झाले, पण हिंदुस्थानात आता बॉम्बस्फोट होत नाही
 • मोदी सरकारच्या पराराष्ट्र धोरणांचा हा विजय आहे, पण ही ताकद मोदींची नाही, तुमच्या मताची आहे
 • फक्त सरकार नाही तर प्रत्येक नागरिकाची छाती अभिमानाने फुलली
 • दोन टप्प्यात झालेल्या मतदानानंतर काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली, मोदींचा मोठा दावा
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठीतून भाषणास सुरुवात