आमचे सरकार आल्यास राफेल कराराची चौकशी करू- शरद पवार


राजेश देशमाने । बुलढाणा

राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अडचणीत आले असतनाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा राफेलचा मुद्दा उपस्थित केला आहे. आघाडी सरकार सत्तेत आल्यास राफेल कराराची चौकशी करू तसेच दोषींवर कारवाई करू असे शरद पवार म्हणाले.

महाआघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी आज सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. तसेच आपण सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने हवाई हल्ला केला. त्यानंतर हिंदुस्थानचे एक विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. तेव्हा जाँबाज अभिनंदन हा अधिकारी पाकिस्तानच्या तावडीत सापडला. केवळ आंतरराष्ट्रीय दबावामुळे अभिनंदन सुटला, मोदींमुळे नाही, असा दावा देखील त्यांनी यासभेत केला. तसेच जर मोदींचा दबाव आहे तर 56 इंचाच्या छाती असलेल्यांनी कुलभूषण जाधवला हिंदुस्थानात परत का नाही आणले, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Lok Sabha Election 2019 update:

 • आमचे सरकार आल्यावर राफेल कराराची चौकशी करून दोषीवर कारवाई करू – शरद पवार
 • राफेलची  चौकशी  झाली  पाहिजे  – शरद पवार
 • राफेल करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा शरद पवारांकडून उल्लेख
 • 56 इंचाची छातीवाले  कुलभूषण जाधवाला  पाकिस्तानच्या तावडीतून  सोडवू शकत नाही – शरद पवार
 • बुलढाणा जिल्ह्यातील जवान पुलवामा हल्यात शहीद झाला त्या अंत्यविधीच्या दिवशी  महाराष्ट्रात पांढरकवडा  येथे  आले  परंतु  बुलढाणा जिल्ह्यात जवानाच्या  अत्यविधीला आले नाही   आणि चौकीदार म्हणतात- शरद पवार
 • आजही बुलढाणा  तालुक्यातील प्रांगीयेथील रामेश्वर उबरहाडे या शेतकऱ्याने आत्महत्या  केली – शरद पवार
 • शेतकऱ्यांच्या आतमहत्या  भाजप सरकारमध्ये वाढल्या- शरद पवार
 • शेतीमालाची किंमत वाढवली पाहिजे- शरद पवार

 • सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना देऊ  -शरद पवार
 • सभेसाठीची तयारी पूर्ण
 • pawar-rally-mandap
 • उमेदवार राजेंद्र शिंगणे यांचा प्रचार करणार
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुलढाण्यात सभा