Live Lok Sabha Election 2019 : महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत 44.23 टक्के मतदान

5

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

महाराष्ट्रात दुपारी तीन पर्यंत 44.23 टक्के मतदान, मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता

प. बंगाल : मुर्शिदाबाद येथील एका मतदान केंद्रावर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हाणामारी, या गोंधळात रांगेत उभ्या असलेल्या एका मतदाराचा मृत्यू

प. बंगाल : मुर्शिदाबाद येथे मतदान केंद्रावर एका अज्ञात व्यक्तीने बॉम्ब फेकला

पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी अनंतनाग जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदान केले

रायगड :- आधी लगीन लोकशाहीचं… अलिबागमधील रूपेश पाटील याने आधी मतदान केले आणि मगच लग्नाच्या बोहल्यावर चढला

rupesh-patil-raigarh-voter

नगर: तिसगाव येथे 5200 मतदारांपैकी 1300 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

नगर: पाथर्डी शहर वगळता मतदारसंघातील 14 ठिकाणची व्होटिंग मशीन बंद पडले होते, मात्र एका तासात ते पुन्हा सुरू करण्यात आले

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता, दुपारी एक पर्यंत 31.99 टक्के मतदान

 • महाड तालुक्यातील दाभोळ मोहल्ल्यातील बुथवर EVM मशीन तांत्रिक बिघाडामुळे काही काळ बंद… बिघाड दुरुस्तीनंतर पुन्हा मतदानाला सुरुवात
 • गुजरात: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी अहमदाबाद मधील शहापूर हिंदी स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला

केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांनी अहमदाबाद येथे मतदान केले

 • महाडमध्ये मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा

mahad-voter

 • सकाळी 11 पर्यंत महाराष्ट्रात 13.89 टक्के मतदान, केरळमध्ये 24.15 टक्के मतदान

 • पारनेर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मतदानाचा हक्क बजावला

anna-hazare-vote-parner

 • मतदान खोळंबा होऊ नये यासाठी निवडणूक प्रशासनाकडून विधानसभा कार्यक्षेत्रातील प्रत्येक बूथ कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश…
 • महाड तालुक्यात इव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड… प्रत्येक ठिकाणी 10-15 मिनिटांच्या फरकांनी EVM  मशीन पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले…
 • रायगड लोकसभेतील महाड तालुक्यातील नागाव भेलोशी मुमुर्शी करंजमाळ येथे इव्हीएम बिघडल्याच्या तक्रारी… मशीन दुरूस्ती नंतर मतदान सुरळीत…
 • रायगडच्या काही भागात इव्हीएम मशीन बिघडल्याच्या तक्रारी
 • रायगड मतदारसंघात अंदाजे सकाळी 11 पर्यंत 17.97 टक्के मतदानपेण 17.35%
  अलिबाग 17.08%
  श्रीवर्धन 18.91%
  महाड 16.61%
  दापोली 20.3%
  गुहागर 17.76%
 • सुनील तटकरे यांचे सहकुटुंब मतदान

sunil-tatkare-family-vote

 • रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बजावला मतदानाचा हक्क

vijay-suryavanshi-raigarh

 • पार्थ पवार यांनी बारामतीतील काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला
 • नगर – वांबोरी येथे मतदानाचा उत्साह, उन असून देखील मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र
 • नगर शहरामध्ये 10 नंतर काही मतदान केंद्रांवर मतदानाचा जोर वाढला
 • रायगड मतदारसंघात अंदाजे सरासरी मतदान सकाळी 9 पर्यंत
 • पेण- 6%
  अलिबाग- 10.22%
  श्रीवर्धन- 4.84%
  महाड- 8%
  दापोली- 5.84%
  गुहागर- 8%
 • साताऱ्यात नरेंद्र पाटील यांनी केले मतदान
 • प. बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये सकाळच्या वेळात हाणामारी, तृणमूलचे समर्थक जखमी झाल्याचे वृत्त
 • प. बंगालमध्ये काही भागात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
 • नगर –  पालकमंत्री राम शिंदे, त्यांच्या पत्नी आशाताई, मुली अक्षदा व अनविता तसेच राम शिंदेचे आई व वडील यांनी सर्वांनी चोंडी  येथे केलं मतदान…

महाराष्ट्रात सकाळी 9 पर्यंत 6.40 टक्के मतदान – PIB

 • नगर – 4 टक्के, पुणे – 8.71 टक्के,  बारामती 6.9 टक्के, संभाजीनगर 9 टक्के, कोल्हापूर 6.71 टक्के, सांगली 7 टक्के, माढा – 7.25 टक्के, जालना 9.23 टक्के
 • देशाच्या विविध राज्यामधील मतदानाची टक्केवारी (सकाळी 9 पर्यंत)

 • देशाची सुरक्षा अधिक चांगली करण्यासाठी, विकासासाठी आणि गतीमान अर्थव्यवस्थेसाठी मतदान करा- अमित शहा
 • मोठ्या प्रमाणात मतदान करा
 • तुमचं एक मत देशाला समृद्ध, मजबूत करेल
 • देशातील सर्व मतदारांनी बाहेर पडून मतदान करावे
 • गुजरातमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे
 • अमित शहा मीडियाला संबोधित करत आहेत
 • संभाजीनगर खासदार चंद्रकांत खैरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला
 • जामखेड येथील बुथ क्र. 310 च्या मशिनीमध्ये बिघाड जवळपास दीड तास मदतान बंद, नवीन मशिन आल्यानंतर 8.30 वाजता मतदान सुरू झाले
 • मला मुख्यमंत्री पदावर जायला नक्की आवडेल, पण मॅजिक फिगर गाठता आली पाहिजे- अजित पवार
 • प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, आपल्याला कारभार करता आले पाहिजे असं वाटतं
 • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे देखील अजित पवार यांनी कौतुक केले
 • भरतीनंतर ओहटी देखील येते, आता मोदींच्या ओहोटीचा काळ- अजित पवार
 • आता नवीन कार्यकर्ते तिथे उभे राहिले आहेत- अजित पवार
 • शरद पवार त्यांना उमेदवारी देत होते तरी ते तिथे गेले, काही तरी खंत असेल
 • विजयसिंह मोहिते पाटील आमच्यासोबत होते, त्यांनी भाजपमध्ये जायला नको होते
 • भाजपला इथे उमेदवारच मिळत नव्हतं, म्हणून त्यांनी मोदींची बारामतीची सभा रद्द केली
 • बारामती जिंकणं भाजपसाठी इतकं सोपं नाही- अजित पवार
 • प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी केले – अजित पवार
 • श्रीगोंदा: परगाव येथे बूथ क्रमांक 195 वरील  EVM मशीनबंद,  दीड तास उलटूनही मतदानास सुरुवात नाही
 • जामखेड : नान्नज येथील मतदान केंद्र क्रमांक 289 मधील मतदान यंत्रात बिघाड, दीड तासाहून अधिक वेळ मतदार मतदानाच्या रांगेत
 • पारनेर शहरातही मतदान यंत्रे सुरू न झाल्याने पंधरा मिनिटे उशिराने मतदानास सुरुवात
 • पारनेर– काळेवाडी(सावरगाव) येथील मतदान यंत्र बंद पडल्याने मतदान सुरू होण्यास तब्बल सव्वा तास उशीर
 • अमोल पालेकर यांनी पुण्यात मतदानाचा हक्क बजावला, (फोटो – चंद्रकांत पालकर)
View this post on Instagram

#loksabha2019 #election #elections2019 #amol #bollywood #voting

A post shared by Dainik (@saamanaonline) on

 • मीडिया आणि पत्रकारांचे मानले आभार मानले
 • लोकशाहीचे शस्त्र हे वोटर आयडी हे आयईडी पेक्षा मजबूत आहे- मोदी
 • दहशतवाद्यांचे शस्त्र आयईडी असते, तर लोकशाहीचे शस्त्र हे वोटर आयडी असते
 • तरुणांना, नवमतदारांना आवाहन करतो की त्यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करावे
 • नीरक्षीर विवेक बुद्धी मतदारांकडे आहे, दूध का दूध पानी का पानी ते जाणतात
 • नागरिकांनी मतदान करावे, कुणाला मतदान करावे, कुणाला न करावे इथल्या जनतेला कळते
 • कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्याचे जसे महत्व आहे, तसाच आजचा दिवस पवित्र आहे
 • आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे, मलाही मतदान करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे
 • सर्व आनंदात आहात ना? खूप मेहनत घेतली तुम्ही सगळ्यांनी, आजचा दिवस संपल्यानंतर थोडी विश्रांती देखील घ्या
 • अहमदाबादच्या रस्त्यावर मोदी मोदीच्या घोषणा
 • अहमदाबादच्या रस्त्यांवर तुफान गर्दी
 • पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद येथे मतदान केले
 • मोदींनी शहा कुटुंबीयांची भेट घेतली
 • अमित शहा यांचे कुटुंब देखील मतदान केंद्रावर उपस्थित
 • पंतप्रधान मोदी मतदान केंद्रावर पोहोचले
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आईचा आशीर्वाद घेऊन मतदानासाठी रवाना झाले

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला

 • महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात

आजचा अग्रलेख : तिसऱ्या टप्प्यातील सुप्त लाट

 

Lok Sabha 2019 लोकसभेच्या महासंग्रामात आज दिग्गजांची कसोटी

www.saamana.com/loksabha-election-2019/

 • गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शहा भाजपकडून निवडणूक लढवत आहेत

मोदींनी अडवाणींना जोडे मारून स्टेजवरून उतरवलं, राहुल गांधींचे वादग्रस्त वक्त्यव्य

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदानापूर्वी आईला भेटण्यासाठी घरी पोहोचले

 • रानिपमध्येच मोदी मतदान करणार
 • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अहमदाबाद मतदारसंघातील रानिप मतदान केंद्रावर पोहोचले

Photo : राज्यात तिसऱ्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

 • नरेंद्र मोदी रानिप मतदान केंद्रावर मतदान करणार
 • सकाळी पहिल्या प्रथम मतदान करण्यास मतदार उत्सुक
 • प्रशासनाची तयारी पूर्ण
 • आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान