मन की बात- विकासकामांचा वेग वाढावा!

3
ssanjay-narvekar

>> संजय नार्वेकर, अभिनेता

lok sabha election 2019 निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मतदान करताना प्रत्येकाने राजकीय पक्षापेक्षा आपल्या विभागातील योग्य उमेदवार बघून मतदान केले पाहिजे असे सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वाटते. जातीपातीचे राजकारण करून मत मागण्यापेक्षा उमेदवारांनी आपल्या विकासकामांच्या जोरावर मत मागितले तर मतदारराजा नक्कीच त्यांना साथ देईल.

विकासकामांबाबत बोलायचे झाले तर समाजाचे भले झाले तर विकास आपोआप होईल. विकासकामे सुरू आहेत पण संथगतीने होतायत. येणाऱया काळात त्यांचा आणखी वेग वाढायला हवा. सध्या देशातील एकंदरीत चित्र पाहिले तर समाजकारणापेक्षा जास्त राजकारण होताना दिसते. राजकारण नेमके कोणत्या दिशेने चाललेय हेच कळत नाही. हे चित्र कुठेतरी बदलले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांनी आवर्जून मतदान करावे. हा आपला हक्क आहे आणि तो प्रत्येकाने बजावावा. तुम्ही मतदान केले तरच तुम्हाला सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे. मतदानाकडे आपण देशसेवा म्हणून बघितले पाहिजे.