मतदान करण्यासाठी मतदाराचे मतदार यादीत नाव बंधनकारक!

3
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

lok sabha election 2019 मतदार ओळखपत्र नसले तरी किंवा मतदान यादीत नाव नसले तरी फॉर्म क्रमांक 7 भरून मतदान करता येते असा मेसेज सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. पण हा मेसेज खोटा असून मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारकच आहे, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

मतदानाच्या संदर्भात सध्या व्हॉटस्ऍप व इतर सोशल मीडियावरून मेसेज फिरत आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. फॉर्म क्रमांक 7 हा इतर व्यक्तींचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी, स्वत:चे नाव वगळण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू अथवा स्थलांतर झाल्यास नाव वगळण्यासाठी आहे. मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. यादीत नाव असेल आणि मतदार ओळखपत्र नसले तरी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या इतर 11 ओळखपत्रांच्या आधारावर मतदानाचा हक्क बजावता येतो, असे मुख्य निवडणूक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.