सैन्याचं क्रेडिट घेण्याची सुरुवात काँग्रेसनेच केली, मोदींचा काँग्रेसवर स्ट्राईक

2
pm-modi-angry

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

Lok Sabha Election 2019 हिंदुस्थानच्या लष्काराकडून दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक अशा मोहिमा मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच यशस्वीरित्या करण्यात आल्या आले. त्यामुळेच सभांमध्ये त्यांचा उल्लेख करून जवानांचे कौतुक केले जाते. यावर काँग्रेससह विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. मात्र सैन्याचं श्रेय घेण्याची सुरुवात ही काँग्रेसने केली असून 1971 मध्ये झालेल्या युद्धाचे क्रेडिट काँग्रेसने घेतले होते, असा प्रत्यारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदींच्या या हल्ल्यानंतर काँग्रेस अडचणीत आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखती दरम्यान मोदींनी अनेक महत्वाच्या प्रश्नांवर आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. बालाकोटमधील एअर स्ट्राईकवरून प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘आमच्या सरकारला सुरक्षादलाच्या शौर्यावर पूर्ण विश्वास आहे. जे लोक यावर प्रश्न विचारत आहेत, त्यांना जनता खणखणीत उत्तर देईल’.

सुरक्षादलांच्या कामगिरीवरून राजकारण केल्याचे आरोप करणार कोण लोक आहेत? असा प्रति प्रश्न करत मोदी म्हणाले ज्यालोकांनी 1971 च्या युद्धाचे क्रेडिट घेतले, आणि आता आमच्यावर आरोप करणारे हे तेच लोक आहेत. पुढे ते म्हणाले की, आर्यभट्ट कृत्रिम उपग्रहाचे क्रेडिट त्यांनी घेतले होते. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात शवपेट्यांच्या घोटाळ्याचे खोटे आरोप हे त्यांनी केले नव्हते का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

1971 मध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात युद्ध करत बांगलादेशची निर्मिती केली होती. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार होते. त्याचे श्रेय इंदिरा गांधींना दिले जाते. त्यांचे कौतुक करण्यात आले होते. इतकेच नाही तर विरोधीपक्षाचे तत्कालीन नेते, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील संसदेत इंदिरा गांधी यांची प्रशंसा करत त्यांना ‘दुर्गा’ असे संबोधले होते.

आपली भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, विंग कमांडर अभिनंदन परतले नसते तर काँग्रेस आणि विरोधक शांत बसले असते? मोदींना काही बोलले नसते? त्यांनी तर कँडल मार्चची तयारी देखील केली होती, असेही मोदी म्हणाले. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर कारवाई केली नसती तर त्यांनी मोदींना दोष दिला नसता का? असा सवाल करतानाच मोदी म्हणाले की सैन्य देशाचे आहे, पराक्रम देखील देशाचा आहे आणि निवडणुकाही देशाच्याच आहेत.