रत्नागिरी-सिंधूदुर्गमध्ये भगवा फडकला, विनायक राऊत यांचा ठासून विजय

262

सामना ऑनलाईन । रत्नागिरी-सिंधूदुर्ग

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना-भाजप- रिपाई महायुतीने जोरदार बाजी मारली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात मतमोजणी सुरू झाली. महायुतीचे विनायक राऊत यांनी विजय मिळवला आहे. राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव केला.

रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी ही सहा विधानसभा क्षेत्रे येतात. गेल्या निवडणुकीमध्येही या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली होती.

2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी विजय मिळवला होता. त्यांना 4,93,088 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक काँग्रेसचे निलेश राणे यांना 3,43,037 मतं मिळाली होती.

2009 मध्ये झालेल्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसच्या निलेश राणे यांनी विजय मिळवला होता. निलेश राणे यांना 3,53,915 मतं मिळाली होती, तर शिवसेना उमेदवार सुरेश प्रभाकर प्रभू यांना 3,07,165 मतं मिळाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या