Lok Sabha Election 2019 शरद पवार यांनी माढा मतदारसंघच का निवडला?

136
फोटो - संदिप पागडे

सामना ऑनलाईन । माढा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय कार्यसमितीची महत्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. माढा लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

meeting-ncp

माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. 2004 मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यावर माढा हा नविन लोकसभा मतदारसंघ उदयास आला होता. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातूनच शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी भाजपचे तत्कालिन उमेदवार आणि सध्या सहकार राज्यमंत्री असलेले सुभाष देशमुख यांचा दारूण पराभव केला होता.

राज्यसभेवर जाण्याचा निर्णय
2014 लोकसभा निवडणुकीवेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवली नाही. त्यावेळी त्यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या ऐवजी विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

मोदी लाटेतही माढा घड्याळाच्या ताब्यात
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पाशवी बहुमत मिळवत सत्ता मिळवली. त्यावेळी असलेल्या मोदी लाटेतही माढा मतदार संघाने राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून दिला. राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सध्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

काय आहेत गणित?
सोलापूर जिल्हा हा सोलापूर, माढा आणि धाराशिव या तीन मतदारसंघात विभागला गेला आहे. या जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस (अ.जा.), फलटण (अ.जा.) (सातारा जिल्हा) हे विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदार संघात येतात.

आपली प्रतिक्रिया द्या