Lok sabha 2019 तीन आमदारांच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये खळबळ, दोघांच्या हातात कमळ

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

17 व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा रविवारी मुख्य निवडणूक आयोगाने दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजतो न वाजतो तोच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आमदार वल्लभ धारिवाय (Vallabh Dharaviy) आपला राजीनामा दिला आहे. धारिवाया यांनी विधानसभा स्पीकर राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदाराची मंत्रिपदी वर्णी

वल्लभ धारिवाय हे गुजरातमधील जामनगर येथील आमदार आहेत. सोमवारी त्यांनी विधानसभा स्पीकर राजेंद्र त्रिवेदी यांची भेट घेत आपला राजीनामा सोपवला. धारिवाय यांच्या आधी जवाहर चावडा आणि परषोत्तम सबारिया यांनी काँग्रेसला रामराम केला होता. जवाहर चावडा यांनी राजीनामा दिला त्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना मंत्रीपदही देण्यात आले.

परषोत्तम सबारिया यांचा भाजपमध्ये प्रवेश
दरम्यान, एकीकडे काँग्रेस आमदार वल्लभ धारिवाय यांनी राजीनामा दिला तर दुसरीकडे काँग्रेस सोडून गेलेले आमदार परषोत्तम सबारिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. परषोत्तम सबारिया सोमवारी गांधीनगर येथे भाजप नेत्यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर 12 मार्चला (उद्या) गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या तयारीत असतानाच तीन आमदारांनी काँग्रेसचा हात सोडल्याने पक्षामध्ये खळबळ उडाली आहे. तसेच काँग्रेस आमदार अल्पेश ठाकूर अर्धा डझन आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनाही ऊत आला आहे. याबाबत अल्पेश ठाकूर यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

alpesh-thakor-in-rally