मिलिंद देवरा यांच्या विरोधात आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल

1
milind-deora

सामना प्रतिनिधी । मुंबई

lok sabha election 2019 दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान झवेरी बाजार येथे जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते.

शिवसेनेकडून याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीत जैन धर्मीयांची मते मिळविण्यासाठी मिलिंद देवरा यांनी शिकसेनेच्या कार्यकर्त्यांनी जैन मंदिरांसमोर मांस शिजवले असे वादग्रस्त विधान 2 एप्रिल रोजी केले होते. यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने ऍड. धर्मेंद्र मिश्रा, ऍड. सुनील घारगे आणि सनी जैन यांनी 8 एप्रिल रोजी देवरांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यासोबत देवरा यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पुराव्यादाखल भाषणाची सीडीही देण्यात आली होती. यातील धार्मिक तेढ निर्माण करणाऱया वक्तव्याची गंभीर दखल घेत आयोगाने 19 एप्रिलला आचारसंहिताभंग केल्याप्रकरणी मिलिंद देकरा यांना नोटीस बजावली होती.

त्यासोबतच एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे देवरा यांच्या वक्तव्याच्या सीडी व त्यासंदर्भातील कागदपत्रांच्या प्रती पाठवत प्रथमदर्शनी आचारसंहिता भंग झाल्याचे दिसून येत असल्याचे 18 एप्रिलला पत्र पाठवून कळवले होते. त्यानुसार देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.