पंजाबी गायक दलेर मेहंदी भाजपत दाखल; निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी शुक्रवारी भाजपत प्रेश केला आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री डॉ. हर्षबर्धन यांच्या उपस्थितीत मेहंदी यांनी भाजपत प्रवेश केला. काही दिवसांपुर्वीच पंजाबी गायक हंसराज हंस यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यांना भाजपने उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूर रिंगणात उतरवले आहे. तसेच अभिनेता सनी देओलनेही भाजपत प्रवेश केला असून त्याला गुरुदासपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आता दलेर मेंहदी यांनी भाजपत प्रवेश केल्याने त्यांना पंजाबमधील एखाद्या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

दलेर मेहंदी यांचा ‘बोलो ता रा रा’ हा पहिला अल्बम 1995 मध्ये आला होता. या अल्बमने त्यांना जगभरात ओळख मिळाली. त्यानंतर 1998 मध्ये ‘तुनक तुनक’ हा अल्बमही लोकप्रिय झाला होता. त्यानंतर दलेर मेहंदी आणि त्यांचा भाऊ शमशेर सिंह यांना मानव तस्करी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. सध्या ते जामीनावर आहेत.