बंगळुरूमध्ये पुण्याची पुनरावृत्ती, हिंदुस्थानने गमावले ५ गडी

सामना ऑनलाईन,बंगळुरू

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानी संघाने ४ विकेट झटपट गमावल्या. यातल्या अभिनव मुकुंदला तर भोपळाही फोडता आला नाही. तर चेतेश्वर पुजारा फक्त १७ धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या मदतीने लोकेश राहुलने हिंदुस्थानी संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र १७ धावांवर कोहलीदेखील बाद झाला. अजिंक्य रहाणेला संघात कायम ठेवण्यावरून बरीच चर्चा झाली होती. त्याच्या फॉर्ममुळे त्याला संघात स्थान दिलं जाऊ नये असा एक मतप्रवाह होता. मात्र विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे हे दोघेही रहाणेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले होते. त्यामुळे टीकाकारांची तोंडे बंद करण्यासाठी रहाणे जबरदस्त खेळी करेल अशी अपेक्षा होती मात्र रहाणे १७ धावा बनवून माघारी परतला. त्यानंतर करूण नायरही २६ धावांवर बाद झाला. दुसऱ्या बाजूला पडझड सुरू असताना लोकेश राहुल मात्र संयमीपणे खेळत होता. त्याने अर्धशतक झळकावलं, अर्थशतक झळकावताच त्याचे प्रेक्षकांना कसे अभिवादन केलं ते पाहा