LIVE- Lok Sabha 2019- देशभरातील मतदान संपले, आता प्रतिक्षा निकालाची

368

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

 • बिहार -49.92%, हिमाचल प्रदेश – 66.18%, मध्य प्रदेश -69.38%, पंजाब-58.81%, उत्तर प्रदेश -54.37%, पश्चिम बंगाल- 73.05%, झारखंड-70.5%, चंदिगढ-63.57%
 • सातव्या टप्प्यात सहा वाजेपर्यंत 49.92% मतदान

 • सातव्या टप्प्यात 7.27 कोटी मतदारांनी केले मतदान. यात 3.47 कोटी महिलांचा तर 3377 तृतीयपंथीयांचा समावेश

 • देशभरात सातही टप्प्यातील मतदान पूर्ण – निवडणूक आयोग

 • देशभरात पाच वाजेपर्यंत 46.75% मतदान
 • हिमाचल प्रदेश- 57.43%, बिहार-46.75%, मध्य प्रदेश -59.75%, पंजाब-50.49%,  उत्तर प्रदेश-47.21%, पश्चिम बंगाल – 64.87%, झारखंड -66.64%, चंदिगढ -51.18%

 • ममता बॅनर्जींनी बजावला मतदानाचा हक्क

 • बिहारमधल्या अर्राह मतदान केंद्रावर जमावाचा हल्ला.
 • बुथ कॅप्चर करणाऱ्यांना अडवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला

 • हिंदुस्थानातील सर्वात उंचावर असलेल्या ताशीगंग मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा

 • हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने बजावला मतदानाचा हक्क

 • सातव्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 51.95 टक्के मतदान
 • बिहारमध्ये 46.66 टक्के मतदान
 • हिमाचल प्रदेश – 49.43 टक्के मतदान
 • चंदिगडमध्ये 50.24 टक्के मतदान
 • झारखंडमध्ये 64.81 टक्के मतदान
 • पश्चिम बंगाल- 63.58 टक्के मतदान
 • उत्तर प्रदेशमध्ये 46.07 टक्के मतदान
 • मध्य प्रदेशमध्ये 57.27 टक्के मतदान
 • पंजाब – 48.18 टक्के मतदान

 • निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील बिहार, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार
 • भटींडामध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार, दोन गटात धुमश्चक्री

 • दुपारी 2 वाजेपर्यंत सरासरी 40.54 टक्के मतदान
 • हिमाचल प्रदेश – 44.42 टक्के मतदान
 • चंदिगडमध्ये 73.50 टक्के मतदान
 • झारखंडमध्ये 52.89 टक्के मतदान
 • पश्चिम बंगाल- 49.87
 • उत्तर प्रदेशमध्ये 37 टक्के मतदान
 • मध्य प्रदेशमध्ये 46.03 टक्के मतदान
 • बिहारमध्ये 36.20 टक्के मतदान
 • तृममूल काँग्रेसच्या बरासत मतदारसंघातील उमेदवार ककोली घोष यांचा मतदान केंद्रावर गोंधळ, सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत घातला वाद

 • दोन गटातील हाणामारीत 2 पोलीस कर्मचारी जखमी, मतदान केंद्रावर प्रचंड तणाव
 • पालीगंजमधील दोन मतदान केंद्रवर जमावाची प्रचंड दगडफेक

 • बिहारच्या पाटलीपुत्र मतदारसंघात पालीगंज मतदान केंद्रावर राडा, मतदारांनी ईव्हीएम मशीनची केली तोडफोड, मतदान थांबवले.
 • मध्य प्रदेशात इंदूरमध्ये 37 अंध महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.

 • मध्य प्रदेशात लग्नानंतर वधू- वराने कुटुंबीयांसोबत बजावल मतदानाचा हक्क, इंदूर मधील केंद्रावर केले मतदान.

 • टीएमसीचे नेते मदन मित्रा यांची मतदान केंद्रावर सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची

 • चंदिगडमध्ये 35.60 टक्के मतदान
 • झारखंडमध्ये 52.89 टक्के मतदान
 • पश्चिम बंगालमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 47.55 टक्के मतदान
 • उत्तर प्रदेशमध्ये 36.37 टक्के मतदान
 • मध्य प्रदेशमध्ये 43.89 टक्के मतदान
 • दुपारी 1 वाजेपर्यंत हिमाचलमध्ये 34.47 टक्के मतदान
 • दुपारी 1 वाजेपर्यंत बिहारमध्ये 36.20 टक्के मतदान
 • दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 39.85 टक्के मतदान
 • तेजप्रताप यादव यांनी मात्र या आरोपांचं खंडन केलं असून आपल्याला मारण्या हा कट असल्याचं म्हटलं आहे. माझ्या अंगरक्षकाने काहीही केलेलं नाही, उलट कॅमेरामननेच माझ्या गाडीचं नुकसान केलं आहे, असं तेजप्रताप यावेळी म्हणाले.
 • काँग्रेसचे पाटणासाहिब येथील उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी बजावला मतदानाचा हक्क
 • राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव मतदानाहून परताताना त्यांच्या अंगरक्षकाने कॅमेरामनला मारहाण केली. कॅमेरामनने फुटेज मिळवत असताना गाडीचं विंडशिल्ड तोडल्यामुळे अंगरक्षकाने त्याच्यावर हल्ला केल्याचं वृत्त आहे.
 • हिमाचल प्रदेशमधील 102 वर्षीय नागरिक शाम सरन नेगी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
 • हिमाचल प्रदेशमध्ये एक नवरा मुलगा बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावर दाखल झाला.
 • केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मनोज सिन्हा यांनी मतदानाचा हक्क बजावला.
 • नो रोड्स, नो व्होट्स- (रस्ते नाहीत तर मत नाहीत) अशी घोषणाबाजी करत मतदानावर बहिष्कार
 • बिहारच्या नालंदातील चांदोरा गावात मतदारांचा मतदानावर बहिष्कार
 • नवज्योतसिंग सिद्धू यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
 • सकाळी 11 वाजेपर्यंत सातव्या टप्प्यात एकूण सरासरी 20.54 टक्के मतदान
 • चंदीगडमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 18.70 टक्के मतदान
 • झारखंडमध्ये 27.71 टक्के मतदान
 • उत्तर प्रदेशमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 18.05 टक्के मतगान
 • पंजाबमध्ये 19.69 टक्के मतदान
 • मध्य प्रदेशमध्ये 20.95 टक्के मतदान
 • सकाळी 11 वाजेपर्यंत हिमाचलमध्ये 16.92 टक्के मतदान
 • सकाळी 11 वाजेपर्यंत बिहारमध्ये 18.90 टक्के मतदान
 • सकाळी 11 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 26.07 टक्के मतदान
 • बसीरहाट येथील निदर्शनांनंतर सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यासाठी अधिक कुमक मागवण्यात आली आहे.
 • लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मतदानाचा हक्क बजावला.
 • पश्चिम बंगालमध्ये मतदारांची केंद्राबाहेर निदर्शनं. बसीरहाट येथील मतदान केंद्रांवर तृणमूलचे कार्यकर्ते मतदान करण्यापासून रोखत असल्याचा निदर्शकांचा आरोप.
 • भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी केलं मतदान
 • हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क
 • तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्त मतदारांना घाबरवत आहेत. भाजप नेते सी. के. बोस यांचा आरोप
 • पंतप्रधानांची केदारनाथ यात्रा हा आचारसंहितेचा भंग- तृणमूलचा आरोप
 • पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसाचार
 • दक्षिण कोलकातामधील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार माला रॉय यांना मतदान केंद्रात जाण्यापासून सुरक्षा दलाने रोखल्याने हिंसचाराला सुरुवात
 • बिहारमध्ये 9 वाजेपर्यंत 10.65 टक्के मतदान
 • हिमाचलमध्ये 9 वाजेपर्यंत 0.87 टक्के मतदान
 • मध्यप्रदेशमध्ये 7.16 टक्के
 • पंजाबमध्ये 4.64 टक्के
 • उत्तर प्रदेशमध्ये 5.97 टक्के
 • पश्चिम बंगालमध्ये 10.54 टक्के
 • चंदिगडमध्ये 10.40 टक्के
 • झारखंडमध्ये 13.19 टक्के
 • मध्यप्रदेशमध्ये भाजप नेते कैलास विजय वर्गीय यांनी बजावला मतदानाचा हक्क
 • ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी बजावला मतदानाचा हक्क
 • केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बजावला मतदानाचा हक्क
 • बिहारच्या पटानासाहिबमध्ये ईव्हीएममशीनमध्ये बिघाड
 • तामीळनाडूतील सुलुर मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
 • क्रिकेटपटू हरभजन सिंग याने बजावला मतदानाचा हक्क
 • बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क
 • हिंसाचारामुळे पश्चिम बंगालमधील निवडणुकीला गालबोट लागले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर येथे सीआरपीएफसह मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
 • बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क
 • उत्तर प्रदेशातील चांदौली येथील तारा जीवनपूर गावातल्या काही मतदारांनी जबरदस्तीने हाताला शाई लावल्याचा आरोप केला आहे. तीन माणसांनी त्यांना शनिवारी 500 रुपयांचे आमिष दाखवलं होतं आणि भाजपला मत देण्याबद्दल सांगितल्याचा आरोप या मतदारांनी केला आहे.
 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदानाचा हक्क बजावला.
 • 23 मे रोजी निकाल लागणार असून याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
 • यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचा समावेश आहे.
 • 59 मतदारसंघांमध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी 13 मतदारसंघ, पश्चिम बंगाल 9, मध्य प्रदेश 8, बिहार 8, हिमाचल प्रदेश 4 आणि झारखंडमधील 3 मतदारसंघांचा समावेश आहे. चंदिगड या केंद्रशासित प्रदेशातही मतदान होणार आहे.
 • या टप्प्यात देशाचे लक्ष पश्चिम बंगालकडे असणार आहे. हिंसाचारामुळे पश्चिम बंगालमधील निवडणुकीला गालबोट लागले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर येथे सीआरपीएफसह मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
 • 918 उमेदवार रिंगणात आहेत.
 • सातव्या टप्प्यात 8 राज्यांतील 59 मतदारसंघांत मतदान होईल.
 • रविवारी (दि. 19) शेवटच्या सातव्या टप्प्यात 8 राज्यांतील 59 मतदारसंघांत मतदान सुरू झालं आहे.
 • गेले दोन महिने सुरू असलेली सतराव्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता संपली.
आपली प्रतिक्रिया द्या