Lok sabha 2019 : डॉ. सुजय विखेंच्या गाठीभेटीने काँग्रेस खिळखिळी

sujay-vikhe-patil

सामना प्रतिनिधी । नगर

काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीत आता बिघाडी होण्यास सुरूवात झाली आहे. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये चांगलीच पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी विखेंच्या भेटी घेतल्याने काँग्रेसमध्ये चलबीचल सुरु झाली असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे आज राष्ट्रवादीची पाच जणांची यादी प्रसिध्द झाली मात्र त्यात नगर दक्षिणचे नांव नसल्याने पुन्हा उमदेवारीमध्ये संभ्रमावस्था झाल्याचे बोलले जात आहे. ऐनवेळेला उमेदवार बदलण्याच्या खेळी सुध्दा सुरु झाल्या असून अन्य पक्षातील उमेदवारांना गळ घालण्याचे प्रयत्नही सुरु झाले आहेत.

Lok sabha 2019 सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट

काँग्रेसचे सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस चांगलीच अडचणीत सापडली आहे. जरी काही जणांनी आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगितले असले तरी दुसरीकडे मात्र, काँग्रेसचे अनेक पदाधिकारी हे विखेंच्या गटामध्ये सामील झाल्याने एक प्रकारे काँग्रेसचा दावा हा फोल ठरत चालल्याचे बोलले जात आहे.

Lok sabha 2019 राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, वाचा सविस्तर…

राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची जागा प्रतिष्ठेची केल्यानंतर काँग्रेसमध्ये मात्र कोणीच बोलायला सध्या तयार नाही, जागाच राष्ट्रवादीकडे असल्याने तसेच उमेदवारही निश्‍चित झाला नसल्याने राष्ट्रवादी बरोबर काँग्रेसचे पदाधिकारी देखील चांगलेच बुचकळ्यात सापडले आहे. आज जाहीर झालेल्या राष्ट्रवादीच्या यादीमध्ये नगर व म्हाडाच्या जागेचा उल्लेख नसल्यामुळे पुन्हा उमेदवारीवरुन तिढा निर्माण झाल्याचे बेालले जात आहे. वास्तविक पाहता राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व अरुण जगताप यांचीच नावे आघाडीवर होती, आज उमेदवारी जाहीर होईल अशी आशा पक्षाला होती. पण उमेदवारी जाहीर न झाल्याने पुन्हा उमदेवारीच्या संदर्भामध्ये बदल होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. त्यातच अन्य पक्षातील काहींना चाचपण्याची हालचाली देखील सुरु झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच बहुदा उमदवारी निश्‍चित करण्याकरीता वेळ लागत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Lok Sabha 2019 : महाराष्ट्रात 1 कोटी 19 लाख तरूण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क

नगरच्या जागेवरुन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सध्या शांततेचे वातावरण आहे. उमेदवारी द्यायची कुणाला हाच प्रश्‍न निर्माण झाल्याने दुसरीकडे काँग्रेसचे अनेकजण हे विखे गटाकडे आकर्षीत होत असल्याने आता जिल्हयात काँग्रेसला घरघर लागणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच नगरपालिकेतही महापौर निवडणुकीत विखे गटाने खेळी केल्याने आता भाजपचा शहरातील गटही त्यांना मदत करणार असल्याने विखे समर्थकांमधून बोलले जात आहे.

राष्ट्रवादीच्या जागेवरुन सुरु झालेला कलह हा काँग्रेसची डोकेदुखी बनला असल्याने त्यातच विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यानीं याचा चांगलाच धसका घेतल्याने आता राष्ट्रवादीचे नेते नगर जिल्हयात येवून नेमके काय साध्य करणार असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.