लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी निवडणूक आयोग सप्टेंबर २०१८ पर्यंत सर्वतोपरी सज्ज होईल, असे निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले काही दिवस लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्रित घेतल्या जाव्यात असा जोरदार आग्रह धरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने त्या दृष्टीने दाखवलेल्या ‘तयारी’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘ईव्हीएम’द्वारे मतदान होणाऱ्या सर्व ठिकाणी भविष्यातील निवडणुकांमध्ये आपले मत कोणत्या चिन्हाला गेले हे मतदाराला दाखवणारी पावती मिळणार आहे. त्यासाठी पेपर ट्रेल मशीन्सचा वापर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने आपल्या यंत्रणेला नुकतेच दिले आहेत. त्यापाठोपाठ लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या कामाला निवडणूक आयोग आता लागला आहे.