लोकसभा निवडणुकीसाठी तालुका प्रशासन सज्ज- राहुल मुंडके

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

लोकसभा निवडणुकीसाठी तालुका प्रशासन सज्ज झाले असून एकूण २६९ मतदान केंद्रात २ लाख ५६ हजार ८६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे १२५० कर्मचार्यांच्या नेमणुका करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके व सहायक निवडणूक अधिकारी योगेश चंद्रे यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली. ते म्हणाले, २ लाख ५६ हजार ८६८ मतदारांमध्ये १ लाख ३१ हजार ५९३ पुरुष तर १ लाख २५ हजार २७१ स्रिया मतदार आहेत.२६९ मतदान केंद्रात शहरी भागात ५५ तर ग्रामीण भागात २१४ मतदान केंद्रे राहणार आहेत.

एकूण २१ झोन तयार करण्यात आले असून शहरातील ९२ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर एका सहायक मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. १२५० कर्मचार्यात २४ झोनल ऑफिसर ,८ शिपाई तसेच निवडणुकीसाठी ३०० कंट्रोल युनिट, ३०० बँलेत युनिट व ३०० हेवी पँट मशीन सज्ज आहेत. जर यदाकदाचित लोकसभेसाठी १६ पेक्षा जास्त उमेदवार गेल्यावर त्यापैकी वरील प्रमाणे मशीन वापरण्यात येतील. २१ बस गाड्या ,७ आयशर ५० जीप २१ टेम्पो ,मतपेट्या ने आन करण्यासाठी लागणार आहेत. तहसील कार्यालयात मिडिया सेंटर तसेच आचार संहिता कक्षा स्थापन करण्यात आला आहे. १९५० या टोल फ्री क्रमांकावर आपण विविध माहिती घेऊ शकता .आचार संहिता भंगाबाबतच्या आँन लाईन तक्रारी साठी सी व्हीजीलंस अँप वर आपण थेट करू करू शकतात. या सर्वासाठी चार टीम कार्यरत केल्या आहेत.

आचार संहिता लागल्यापासून शहरातील पंचायत समितीने १२८ पोस्टर, १७९ बोर्ड, १६० कोनशीला, ५६ बनर २४८ झेंडे ,व्होर्डींग ४८ काढून टाकले आहेत, अशी माहिती आचार संहिता कक्षातून सहा.नि.नि.अधिकारी मुंडके यांनी तर नियोजनाबाबत काही माहिती सहा.नि.नि.अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्र यांनी दिली. नायब तहलीसदार शिवाजी सुसरे यांनी आभार मानले.