विजय मल्ल्याला ब्रिटनच्या हायकोर्टाचा झटका

11

सामना ऑनलाईन। लंडन

हिंदुस्थानातील बँकांची नऊ हजार कोटींची थकबाकी असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला ब्रिटनमधील उच्च न्यायालयाने शनिवारी झटका दिला. दियाजियो या ब्रिटिश कंपनीचे 13.5 कोटी डॉलर्स म्हणजेच 945 कोटी रुपये 28 दिवसांत परत करण्याचे आदेश न्यायालयाने मल्ल्या याला दिले.

मद्यनिर्मिती करणाऱया दियाजियो या कंपनीबरोबर मल्ल्याने करार केला होता, परंतु त्याचे पालन न केल्याने कंपनीने मल्ल्याविरोधात दावा ठोकला होता. फेब्रुवारी 2016 मध्ये दियाजियोने मल्ल्याच्या युनायटेड स्प्रिटस् लिमिटेड (यूएसएल) आणि सीएएसएल या कंपन्यांमधील हिस्सेदारी विकत घेण्यासाठी पैसे दिले होते, परंतु दियाजियोला ती हिस्सेदारी मिळाली नाही. दियाजियोने मल्ल्याला त्यावेळी चार कोटी डॉलर्स दिले होते. मल्ल्याची ही कंपनी त्याचा मुलगा सिद्धार्थ चालवतो.

आपली प्रतिक्रिया द्या