ऑगस्टमध्ये सलग सुट्ट्यांचा पाऊस, ‘येथे’ जा फिरायला…

सामना ऑनलाईन । मुंबई

ऑगस्ट महिन्यााला सुरुवात झाली असून सर्वत्र पावसामुळे आल्हाददायक यादव वातावरण तयार झाले आहे. या महिन्यात दोन वेळा सलग सुट्ट्या आल्या असून या सुट्ट्यांना तुम्हाला बाहेर फिरायला जाण्याची सुवर्णसंधी आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिवस म्हणजेच १५ ऑगस्ट असून त्यानंतर १७ ऑगस्टला पारसी नव वर्ष आहे. त्यानंतर १८ आणि १९ ऑगस्टला विकेंड आहे. त्यामुळे जर तुम्ही १६ ऑगस्टला सुट्टी टाकली तर तुम्हाला सलग पाच सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. या पाच दिवसात तुम्ही मोठ्या टूरवर जावू शकतात. तसेच २२ ऑगस्टला ईद-अल-जुहा आणि २४ ऑगस्टला ओणम सण (केरळसाठी) आहे. त्यानंतर २५ आणि २६ ऑगस्टला विकेंड आहे. त्यामुळे २३ ऑगस्टला सुट्टी टाकली तर तुम्हाला पुन्हा एकदा पाच दिवसांच्या सलग सुट्ट्या मिळणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही लडाखच्या टूरवर जावू शकता.

येथे जा फिरायला –

लडाख –

ladakh01

रोजच्या धावपळीच्या जीवतानातून वेळ मिळाला असेल तर रिलॅक्स होण्यासाठी लडाख हे उत्तम ठिकाण आहे. फिरायची आवड असणाऱ्यांनी एकदा तरी लडाखची टूर करावी. लडाखमधील जंस्कार व्हॅली, सरदुंग-ला-पास, हेमिस नॅशनल पार्क आणि स्पीतुक गोम्पा येथे भेट द्यायला विसरू नका.

केरळ –

kerala01

सलग सुट्ट्यांमध्ये लाहौल-स्पीति येथे जाणे थोडे अवघड वाटत असले तरी त्याला केरळ हा उत्तम पर्याय आहे. येथे नारळाचे उंच झाडे, बेकवॉटर, केरळची संस्कृती आणि परंपरा पाहण्यासाची चांगली संधी आहे. फॅमिली हॉलीडे किंवा हनीमूनला जाण्यासाठी केरळ सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील पर्वतरांगांमध्ये वेगवेगळ्या फुलांचा सडा पडलेला असतो. पावसाळ्यात या ठिकाणी देशी-विदेशी पर्यटकांची रीघ लागलेली असते.

उत्तराखंड –

uttarakhand01

उत्तराखंडमधील घाटांमधील डोळे दिपवणारा नजारा पाहण्याची संधी या सुट्ट्यांमध्ये तुमच्याकडे आहे. येथील फुलांचा वर्ल्ड हेरिडेज साईटमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. येथे फुलांच्या अगणित प्रजाती आढळून येतात.

अंदमान-निकोबार –

andman-nicobar01

जर या सुट्ट्यांमध्ये तुम्ही शांत आणि हिरवळीच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर अंदमान आणि निकोबार बेट हा देखील एक पर्याय आहे. येथील शांत समुद्र, वाळूचे किनारे तुम्हाला नक्कीच आकर्षीत करतील. येथील राधानगर, डॉल्फिन रिजॉर्ट, सेल्युलर जेल फिरण्यासाठी उत्तम आहे. कमी पैशात फिरण्यासाठी अंदमान सर्वोत्तम पर्याय आहे.

नॉर्थ ईस्ट –

meghalaya-seven-sister-fall

नॉर्थ ईस्टमधील पर्वतरांगा, वळणावळणाचे रस्ते, हिरवळ, झाडी, धबधबे तुम्हाला आकर्षीत करतील. यासाठी मेघालय हा पर्याय आहे. पावसाळ्यात मेघालयात स्वर्ग अवतरल्यासारखे वाटते. येथील सेव्हन सिस्टर फॉल, उमियम लेक, एलिफेन्ट लेक, स्पेड ईगल फॉल, शिलाँग व्ह्यू पॉईंट, गारो हिल्स, खासी हिल्स फिरण्यासाठी चांगला पर्याय आहे.

गंगटोक, सिक्किम –

sikkim

सिक्किमची राजधानी गंगटोकही फिरण्यासाठी चांगले ठिकाण आहे. ऑगस्टमधील सुट्ट्या घालवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. येथे एकदा गेला की परत यावेसे वाटणारही नाही इतका हा परिसर सुंदर आहे.