‘लाँगेस्ट यार्ड’मुळे प्रसिद्ध झालेल्या बर्ट रेनॉल्ड यांचे निधन

सामना ऑनलाईन, फ्लोरिडा

लाँगेस्ट यार्ड या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या आणि या चित्रपटाच्या रिमेकमध्ये कोचची भूमिका साकारणारे बर्ट रेनॉल्ड्स यांचे निधन झाले आहे ते 82 वर्षांचे होते. फ्लोरिडातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. क्विटींन टॅरेन्टीनो यांच्या आगामी चित्रपटात काम करण्याची त्यांची इच्छा होती, मात्र ही इच्छा अपूर्ण राहिली आहे.

2010 साली रेनॉल्ड्स यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2013 साली त्यांना फुफुस्सांतील संसर्गामुळे आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं.

बूगी नाईटस, लाँगेस्ट यार्ड मूळ चित्रपट आणि त्याचा रिमेक, स्मोकी अँड बँडीट हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. 1978 ते 1982 पर्यंत रेनॉल्डस हे सर्वात लोकप्रिय अभिनेता होते.