स्मार्ट दिसा

चारचौघांत आपण उठून दिसावं, आकर्षक दिसावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. याकरिता आपले दैनंदिन राहणीमान, नित्याच्या सवयी, सौंदर्यप्रसाधने, कपडे याबाबत जागरूक असण्याची आवश्यकता आहे.

  • पार्टी, विवाह यांसारख्या विशेष प्रसंगी उंच टाचांच्या चपला वापरा. त्यामुळे चालीत आत्मविश्वास येऊन तुम्ही आकर्षक दिसाल.
  • लाल रंग पुरुषांना आकर्षित करतो, असे म्हटले जाते. याकरिता लाल रंगाचे कपडे किंवा लाल रंगाची लिपस्टिकही वापरू शकता. लाल रंगामुळे स्त्रियांच्या सौंदर्यात अधिकच भर पडते.
  • बंद खांद्याचे उत्कृष्ट आणि आकर्षक कुर्ते तसेच खांदे थोडेसे उघडे राहतील असे नाजूक टॉप परिधान केल्यास स्त्रिया मादक दिसू शकतात.
  • घट्ट बॉडीकॉन ड्रेस ज्याचा गळा पूर्ण बंद आहे, स्कर्ट, फ्रॉकसारखे जे कमी उंचीचे आहेत, असे कपडे परिधान केल्यास सगळ्यांच्या नजरांना आकर्षित करू शकाल.
  • कपड्यांमध्ये नाजूकता, भरीवपणा आणि आकर्षकता येण्यासाठी लेस उपयुक्त ठरते. त्यासाठी कपड्यांना लेस लावा. विविध प्रकारच्या कपड्यांना साजेशा लेस बाजारात मिळतात.
  • कोणत्याही स्लीव्हलेस फ्रॉक, टॉपवर तुम्ही लेदर जॅकेट घालू शकता. लेदर जॅकेट घालणे हा आधुनिक फॅशनचा एक उत्तम प्रकार आहे. डोळ्यांत भरणारा लूक येतो.
  • कधी कधी साध्या कपड्यांमध्ये आपण जास्त उठून दिसतो. निळ्या किंवा काळ्या रंगाची जीन्स आणि त्यावर पांढऱ्या रंगाची विजार आपल्या व्यक्तिमत्त्वाला उठावदारपणा आणते.