यंत्रांचं जग


मेकॅनिकल इंजिनीअरच्या क्षेत्रात रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. ज्युनियर मेकॅनिकल इंजिनीअर आणि सीनियर मेकॅनिकल इंजिनीअर हे दोन प्रकार आहेत. मेकॅनिकल इंजिनीअर म्हणजेच यांत्रिक अभियंता ही अभियांत्रिकी शाखेतील सर्वात जुन्या शाखांपैकी एक आहे. वाफेचे इंजिन, विजेचे उत्पादन करणारी यंत्रे, गॅस टर्बाइनचे डिझाइन करणे हे याचे कार्यक्षेत्र आहे. मेकॅनिकल इंजिनीअरच्या क्षेत्रात रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. ज्युनियर मेकॅनिकल इंजिनीअर आणि सीनियर मेकॅनिकल इंजिनीअर हे दोन प्रकार आहेत. या क्षेत्रात नोकरी आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. शिवाय वेतनही अनुभवानुसार चांगले मिळते. उमेदवाराला परदेशात जाण्याचीही संधी मिऴू शकते. यांत्रिक अभियंता क्षेत्रात उमेदवाराची योग्यता त्याचा अनुभव आणि तो कोणत्या संघटनेबरोबर काम करतोय यावर अवलंबून असते.

अन्य कोर्सेस
या शाखेत ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग, पॅकेजिंग टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल ऍण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड इन्स्टमेंटेशन, कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, माइनिंग इंजिनीयरिंग, मेटलॉर्जिकल इंजिनीअरिंग, टेक्सटाइल टेक्नोलॉजी, केमिकल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग इन प्लॅस्टिक ऍण्ड पॉलिमर्स, पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग, एयरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग, ऑफिस मॅनेजमेंट ऍण्ड कॉम्प्युटर ऑप्लिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अशा प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. पॉलिटेक्निक इन्स्टिटय़ूट सर्टिफिकेट कोर्स करण्याचीही संधी आहे.

महाविद्यालये
– इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली
– इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई
– इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुवाहाटी

पात्रता
– ज्युनियर मेकॅनिकल इंजिनीअर होण्यासाठी डिप्लोमा कोर्स करणे अनिवार्य आहे. हा कोर्स करण्यासाठी १०वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यामध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांत उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहे.
– डिप्लोमा कोर्सचा कालावधी ३ वर्षांचा असतो. मात्र १२वी उत्तीर्ण केल्यानंतर हा कोर्स केल्यास हा अवधी फक्त २ वर्षांचाच असतो.
– मेकॅनिकल, सिव्हील, इंजिनीअर होण्याकरिता उमेदवाराला १२वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी बी.टेक आणि से.बीई हे कोर्स करणे अनिवार्य आहे. याचा कालावधी ४ वर्षांचा असतो.
– बीई किंवा बीटेक कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात उत्तम गुण मिळणे आवश्यक असते. शिवाय इंजिनीअरिंग एन्ट्रन्स परीक्षाही द्यावी लागते. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांनाच हा कोर्स करण्याची संधी दिली जाते.
– विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाची निवड त्यांना मिळणाऱ्या गुणांवर अवलंबून असते. सिव्हिल इंजिनीअरिंग केल्यानंतर एमई आणि एमटेक हे कोर्स करता येतात.