मुंबईत घरांचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत

सामना ऑनलाईन । मुंबई

म्हाडाच्या मुंबई विभागातील ८१९ घरांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहेत. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाटय़गृहात १० नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे. यंदा ८१९ सदनिकांच्या सोडतीसाठी ६५१२६ अर्जदार पात्र ठरले आहेत.

प्रतीक्षानगर-सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे, कन्नमवारनगर, चारकोप, गोरेगावमधील सिद्धार्थनगर, उन्नतनगर, मालवणी मालाड, लोअर परळ, तुंगा-पवई येथील घरांचा समावेश होता. सोडतीचा निकाल पाहण्यासाठी अर्जदार स्वतः सभागृहात उपस्थित राहू शकतात तसेच सभागृहाखालील मोकळय़ा जागेत अर्जदारांना निकाल पाहता यावा यासाठी एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही संकेतस्थळावर ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्यासाठी http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.