लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज…कशात आहे खरे सुख

सामना ऑनलाईन। मुंबई

लग्न हे आयुष्यभरासाठी दोन जीवांना जोडणार क्षण… पण बऱ्याचदा अनेकजण या लग्नाच्या बाबतीत इतके गोंधळलेले असतात की लव्ह मॅरेज कराव की अरेंज मॅरेज या प्रश्नाच उत्तरच त्यांना सापडत नाही. मग हे उत्तर शोधण्यात लग्नाच वय निघून जात. संशोधकांनी यावर नुकतच एक संशोधन केलंय त्याबद्दल जाणून घेऊया.

love-amriage

संशोधकांनी केलेल्या सर्व्हेनुसार हिंदुस्थानमध्ये ७५ टक्के लोकांची पसंती ही अँरेंज मॅरेजलाच असते. याला कारण म्हणजे आपल्या देशात विवाह संस्थेला फार महत्त्व आहे. यामुळे अँरेंज मॅरेज हे कुंटुंबीयांच्या परवानगीने झालेले असते. दोन्ही घरांना एकमेकांची ओळख असते. मुलामुलीचा पूर्वइतिहास माहीत असतो. यामुळे फसवणुकीचा धोका कमी, शिवाय दोघात नंतर वाद झाला तरी मध्यस्थी करण्यास घरातले नेहमीच तयार असतात. तसेच दोघांना एकमेकांची आर्थिक परिस्थिती माहीत असल्याने एकमेकांकडून वारेमाप अपेक्षा अँरेंज मॅरेजमध्ये नसतात. यामुळे ही जोडपी आखून रेखून संसार करतात. तसेच लग्नानंतर प्रेम सुरू होत असल्याने या जोडप्यातले प्रेम लव्ह मँरेज वाल्यांच्या तुलनेत अधिक काळ टीकते, असं संशोधकांच म्हणणं आहे. पण कधी कधी जोडीदाराचे लग्नाआधीचे व नंतरचे रूप वेगळे वाटल्यास अँरेंज मॅरेजमध्येही दुरावा येऊ शकतो.

arrange-marriage

लव्ह मॅरेजमध्ये दोघांची मैत्री झालेली असतेच. त्यामुळे स्वभावगुण आधीपासूनच माहीत असतात. प्रेमात असताना समोरच्याचे अवगुणही दुर्लक्षीले जातात. कारण प्रेमाची नशा असते. यामुळे वाईट गुण कळत नाहीत, सगळं चांगलच वाटतं. पण कालांतराने सुरुवातीला दुर्लक्षीले गेलेले ते अवगुण संसारात वादास कारणीभूत ठरतात. फिरणे, भटकणे आधीच झाल्याने लग्नानंतर फिरण्यात यांना फार रस राहत नाही. त्यामुळे वाद होतात. शिवाय लव्ह मॅरेज असल्याने कुटुंबीय या वादात फार पडताना दिसत नाही. यामुळे मध्यस्थाची भूमिका यातील एका जोडीदारालाच घ्यावी लागते, नाहीतर संबंध ताणले जाऊन तुटण्याची शक्यता निर्माण होते. पण जर दोघापैकी एक समजूतदार असेल तर लव्ह मॅरेज दिर्घकाळ टीकतं.

marraige1

संशोधकांच्या मते हिंदुस्थानमध्ये सर्वाधिक घटस्फोट हे लव्ह मॅरेज लग्न झालेल्यांचेच होत आहेत. यामुळे लव्ह मॅरेज किंवा अँरेंज मॅरेज करताना जोडीदाराचे सौंदर्य आणि आर्थिक सुबत्ता बघू नका, तर विचारांशी सुसंगत असलेला जोडीदार निवडणे कधीही चांगले.