शनिवारवाड्यात ‘लव्हयात्री’चे प्रमोशन


सामना ऑनलाईन । मुंबई

सलमान खान फिल्म्स या बॅनरखाली झळकणार्‍या आयुष शर्मा आणि वरीणा हुसैनच्या ‘लवयात्री’ सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. लवकरच ही जोडी पुण्यात अवतरणार असून येथील शनिवारवाड्यात ‘लवयात्री’चे प्रमोशन होणार आहे. कोलकता, रांची, लखनऊ, वाराणसी, पटणा, भोपाळ, बडोदा आणि जयपूरनंतर या चित्रपटाची टीम आता पुणे दौरा करणार आहे. या सिनेमाची कथा गुजरातमधील असून नवरात्रीवर आधारित हा सिनेमा आहे. गुजराती लेखक नीरेन भट्ट यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे. अभिराज मीनावाला निर्देशित हा चित्रपट  5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.