स्वयंपाकाचा गॅस मिळणार हप्त्यावर, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा 

11


सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली 

उज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकार गरिबांना सवलतीच्या दरात स्वयंपाकाचा एलपीजी गॅस सिलिंडर पुरवणार आहे. विशेष म्हणजे गरिबांना 4 हप्त्यात या गॅस सिलिंडरची किंमत चुकती करण्याची सुविधा सरकार देणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

देशातील प्रत्येक गरीब कोट्यवधी गरिबांना आतापर्यंत उज्वला योजनेंतर्गत सवलतीच्या दरात सिलिंडर पुरविण्यात आले आहेत.पण लाभार्थींपैकी 20 टक्के ग्राहक सवलतीच्या दरातील रक्कम एकहाती भरू शकत नाहीत.त्यामुळे त्यांना प्रति किलोने चार हप्त्यांत गॅस सिलिंडर पुरविण्याची सुविधा सरकार देणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या