योगी सरकारने हज हाऊसही भगवे केले

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेश सरकारच्या बस, विजेचे खांब, सरकारी वेबसाईट, सरकारी माहिती पुस्तिका यांच्या पाठोपाठ योगी सरकारने हज हाऊसही भगवे केले आहे. योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशातील हज हाऊस भगव्या रंगात रंगवले आहे. मुस्लिम समाजातील काही संघटना व राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारच्या या कृतीला तीव्र आक्षेप घेतला आहे.

हज यात्रेकरुंची मक्केला जाण्याची सर्व व्यवस्था हज हाऊसच्या इमारतीतून केली जाते. मक्केला जाण्यासाठी याच ठिकाणांहून परवानगी मिळते. तिथे सरकारी अधिकारी विविध कागदपत्रे तपासतात. उत्तर प्रदेशमध्ये हज हाऊस लखनौ येथे आहे. या इमारतीच्या बाहेरील भिंती योगी सरकारने भगव्या रंगात रंगवल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील सर्व संघटना भगव्या रंगाच्या माध्यमातून स्वत:ची ओळख सांगतात. भाजपही याच परिवाराचा भाग असल्याने विरोधकांनी हज हाऊस भगवे करण्याच्या सरकारी कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारमधील एकमेव मुस्लिम मंत्री मोहसीन रझा यांनी सरकारी निर्णयाचे समर्थन केले आहे. ‘भगवा रंग हा तेजस्वी, उत्साह निर्माण करणारा आहे. या रंगामुळे इमारत खुलून दिसते. त्यामुळेच हज हाऊसच्या बाहेरील भिंती भगव्या रंगात रंगवल्या आहेत, असे मोहसीन रझा म्हणाल्या.

  • Sandeep Pune

    shivsenela hyacha abhiman wataayla hava.