मदरशामध्ये अश्लिल फोटो दाखवून अत्याचार

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सहादतगंज येथील जामिया खदीजातुल लीलनवास यासीनगंज मदरशावर शुक्रवारी पोलिसांनी छापा टाकत ५१ मुलींची सुटका केली. मदरशाचा मॅनेजर मोहम्मद तैयब जिया याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलींचे अपहरण करणे, फसवणूक करुन त्यांना कोंडून ठेवणे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे अशा स्वरुपाचा गंभीर आरोप मदरशाच्या मॅनेजवर पोलिसांनी ठेवला आहे. पीडित मुलींनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती पोलिसांना दिली आहे.

मदरशामध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार; ५१ मुलींची सुटका, मॅनेजरला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदरशामध्ये झालेल्या लैगिक अत्याचारांमुळे पीडित मुलींच्या मनःस्थितीवर परिणाम झाला आहे. अत्याचाराला विरोध केल्यावर पीडित मुलींना मारहाण करण्यात येत होती. मदरशामधून सोडवण्यात आलेल्या मुलींना नारी बंदी निकेतनमध्ये ठेवण्यात आले असून त्यांचे काउंसलिंग सुरू आहे. चाइल्ड वेलफेअर कमिटी आणि मॅजिस्ट्रेट समोर पीडित मुलींची फिर्याद नोंदवण्यात येत आहे.

‘जनावरालाही मिळणार नाही अशी वाईट वागणूक आम्हाला मदरशामध्ये मिळत होती. तो (मॅनेजर) आम्हाला त्याच्या ऑफिसमध्ये बोलवायचा आणि पाय दाबण्यास सांगायचा. त्याचे म्हणणे ऐकले नाही तर आम्हाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायचा. आम्ही अनेकवेळी या अत्याचारांना कंटाळून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या (मॅनेजर) माणसांची आमच्यावर नेहमी नजर असायची’, असे एका पीडित मुलीने सांगितले. तर दुसऱ्या मुलीने सांगितले की, ‘आम्ही मदरशामध्ये शिकण्यासाठी जात होतो मात्र तो आम्हाला चहा बनवायला सांगायचा आणि हातपाय दाबून घ्यायचा. मुलींना अश्लिल फोटो दाखवून त्याच्याशी लैगिक विषयांवर चर्चा करण्याची सक्ती करायचा. त्यानंतर मुलींच्या शरीरावर हात फिरवायचा.