हिचे डोळे पाहिलेत का? मॉडेलची होतेय चर्चा

सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया

सध्या  इंटरनेवर एका मॉडेलची खूप चर्चा होतेय. कॅलिफोर्नियात रहाणारी साराह मॅक डॅनियल या २० वर्षाच्या मॉडेलच्या सौंदर्यावर घायाळ होणाऱयांची संख्याही मोठी आहे. या मॉडेलची चर्चा होतेय ती तिच्या डोळ्यांच्या रंगामुळे. साराहच्या एका डोळ्याचा रंग निळा आहे तर दुसऱया डोळ्याचा रंग तपकिरी आहे. हा एकप्रकारचा जेनेटिक प्रॉब्लेम असून मेडिकल टर्ममध्ये याला हेटेरोक्रोमीया इरिड्म म्हणतात. या लोकांच्या डोळ्यांचे रंग वेगवेगळे असतात. साराहला मात्र याचा फायदाच झाला आहे. तिच्या या डोळ्यांमुळे ती लोकांचे पटकन लक्ष वेधून घेत आहे. खूप कमी वयात आणि कमी काळात ती मोठी मॉडेल बनली आहे.