हॉट नेहा पेंडसेचा बोल्ड पोल डान्स!

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या व्हिडिओमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पोल डान्स करताना दिसत आहे. या पोल डान्समध्ये नेहाचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या चाहत्यांकडूनही तिच्या या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला जवळपास १० हजार जणांनी लाईक केलं आहे.

नेहाने याआधीही काही दिवसांपूर्वीही तिच्या पोल डान्सचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र डान्समधील तिचा बोल्ड अंदाजामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. मराठी सिनेसृष्टीत काम केल्यानंतर नेहा सध्या हिंदीतील ‘मे आय कम इन मॅडम’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचत आहे. या कार्यक्रमातील तिची ‘मॅडम जी’ची भूमिका चांगलीच गाजत आहे.

One short but effective practise session #sick #cannotstop #poleislife #polecommunity

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse) on