‘लोकांकडे पाण्याचा ग्लास घेऊन जावू का?’ भाजप नेत्याचे असंवेदनशील वक्तव्य

सामना ऑनलाईन । लखनौ

महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘पाणी नाही तर मी काय आता धरणात मुतू का?’ असे असंवेदनशील वक्तव्य केले होते. याचा वक्तव्याची आठवण करून देणारे वक्तव्य आता भाजप नेत्याने केले आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता असून दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधी भाजप खासदार लक्ष्मी नारायण यादव यांना प्रश्न विचारला असता, ‘आम्ही काही करू शकत नाही, पाण्याचा ग्लास घेऊन लोकांकडे जावू का?’ असे असंवेदनशील वक्तव्य केल आहे. तसेच पाण्याची कमतरता नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

यादव एका कार्यक्रमात सहभागी झाले होते तेंव्हा त्यांना या विषयावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर यादव यांनी हे उद्धट उत्तर दिले. यादव म्हणाले की, , ‘आम्ही पाण्याची टाकी बांधून देऊ आणि पाण्याची व्यवस्था करू.’ यावर टाकी तर बाधून दिली पण नळाची योजना का कार्यान्वीत झाली नाही? असा प्रश्न त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘ही समस्या अनेक वर्ष जुनी आहे आणि आणखी काही महिने तशीच राहिली तर आभाळ कोसळणार नाही.’