आता ‘हिंग्लिश’मध्ये परीक्षा द्या, मध्य प्रदेश मेडिकल विद्यापीठाचा निर्णय

37
exam_prep
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । भोपाळ

मेडिकलची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे माध्यम म्हणून इंग्रजीसोबतच हिंदी आणि हिंग्लिशचा पर्याय देण्यात आला आहे. मध्य प्रदेश मेडिकल विद्यापीठाने हा निर्णय घेतला असून यापुढे आयुर्वेद, होमिओपॅथीचे विद्यार्थी हिंग्लिशमध्ये (हिंदी-इंग्रजी एकत्र) उत्तरपत्रिका सोडवू शकतात. इंग्रजीऐवजी इतर भाषेत मेडिकलची परीक्षा घेणारे मध्यप्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

विद्यापीठाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. यात अभ्यास मंडळाने सर्व होमिओपॅथी, आयुर्वेदीक कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीसह हिंदी आणि हिंग्लिशचा पर्याय दिल्याचे म्हटले आहे. हिंग्लिश हा पर्याय अशी विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना इंग्रजीतील वैज्ञानिक शब्दांचा अर्थ हिंदीमध्ये सापडत नाही. अशावेळी विद्यार्थी हिंग्लिशचा वापर करू शकतात. ही सुविधा एमबीबीएस, नर्सिंग, डेंटल, युनानी, योगाच्या विद्यार्थ्यांना देण्याचाही विचार सुरू आहे. ही सुविधा तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेतही असणार आहे.

तर गुण कापणार नाही
विद्यार्थ्यांना जर इंग्रजीतील एखाद्या टेक्निकल किंवा वैज्ञानिक शब्दाचा हिंदी अर्थ विद्यार्थ्याला माहित नसेल तर विद्यार्थी तो शब्द हिंग्लिशमधून सांगू शकेल. विद्यार्थ्याचे उत्तर जर टेक्निकली योग्य असेल तर त्याला पूर्ण गुण मिळतील.

मातृभाषा हिंदीला प्राधान्य
विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकावर कुलगुरू डॉ.आर.एस.शर्मा यांची स्वाक्षरी आहे. या परिपत्रकात त्यांनी म्हटले आहे की ही सुविधा अशा विद्यार्थ्यांसाठीच आहे ज्यांना त्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान असूनही इंग्रजीतून उत्तर लिहीण्यास ते सक्षम नाहीत. याचबरोबर जगात मातृभाषा हिंदीला स्थान देण्यासाठीदेखील हा निर्णय घेण्यात आल्याचे शर्मा यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हिंदी भाषा इंग्रजीपेक्षा समजण्यास सोपी जाते. भोपाळमधील प्राध्यापकांचा मते हा एक क्रांतिकारी निर्णय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी तोडके मोडके इंग्रजी बोलतात. पण त्यांना संपूर्ण लेखी पेपर इंग्रजीमधून देण्यास खूपच अडचणी येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्ता असूनही केवळ भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे मागे राहिले होते. पण आता या विद्यार्थ्यांची भाषेची समस्या मिटणार आहे. डॉ. शर्मा ने कहा, ’वह उत्तर जानते हैं लेकिन उसे इंग्लिश में ठीक तरीके से लिख नहीं पाते हैं। यह फैसला ऐसे छात्रों के हितों को ध्यान में रखकर लिया गया है और इसमें क्या गलत है कि अगर किसी को उसकी मातृभाषा में लिखने की इजाजत दी जाती है, जो कि हमारी राष्ट्रीय भाषा भी है?’

आपली प्रतिक्रिया द्या