खंडाळ्याच्या घाटात रेल्वे वाहतूक बाराच्या भावात


सामना ऑनलाईन, पुणे

मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही शुक्रवारी दुर्घटनेचं ग्रहण लागलं. खंडाळ्याच्या घाटामध्ये मदुराई एक्सप्रेसची बोगी घसरली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र त्याचा परिणाम मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या गाड्यांवर झाला आहे. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी एस्कप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक किमान ३० मिनिटे उशिराने होत आहे. मदुराई एक्सप्रेस रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून मार्गस्थ केली आहे मात्र बोगी हटवण्याचं काम अजूनही सुरू आहे. रेल्वे वाहतूक उशिराने होत असल्याने मुंबईहून पुण्याला कामासाठी निघालेल्या प्रवाशांना पुणे वेळेत गाठणं शक्य होणार नाहीये.