महाबळेश्वरमध्ये पाऊस झाला यमला पगला दिवाना, चेरापुंजीलाही मागे टाकले

1

सामना ऑनलाईन, सातारा

राज्यातील बहुतांश भागामध्ये जून महिन्यापासून आत्तापर्यंत अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. महाबळेश्वरमध्ये यंदा जरा जास्तच चांगला पाऊस झाला असून या पावसाने इथे चेरापुंजीचाही रेकॉर्ड मोडला आहे.  आत्तापर्यंत देशातील सर्वाधिक पावसाची नोंद ही मेघालयातील चेरापुंजीमध्ये होते असं आकड्यांच्या आधारे सांगितलं जात होतं. मात्र पावसाने यंदा हे आकडे बदलले असून चेरापुंजीपेक्षा महाबळेश्वरमध्ये तब्बल ९०० मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे.

जून जुलै आणि ऑगस्ट तीनही महिन्यात महाबळेश्वरमध्ये चांगला पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने ५ हजार मिलीमीटरचा आकडा गाठला होता. २७ ऑगस्टला नोंदवण्यात आलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार चेरापुंजीमध्ये ४७२९ मिलीमीटर पाऊस झाला होता तर महाबळेश्वरमध्ये ५६२० मिलीमीटर पाऊस झाला होता.