महालक्ष्मी आणि वांद्रय़ाचा रेल्वे ब्रिज सुरक्षित

सामना प्रतिनिधी । मुंबई

महालक्ष्मी आणि वांद्रे येथे वाहनांसाठी असलेले रेल्वे ब्रिज वाहतूकीच्या दृष्टीने सुरक्षित आणि सक्षम आहेत. अंधेरी येथील ब्रीजचा काही भाग कोसळून झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत रेल्वेने सर्व पुलांचे ऑडिट सुरू केले आहे. त्यानुसार महालक्ष्मी आणि वांद्रय़ाचा रेल्वे बीजच्या स्ट्रक्चरची शुक्रवारी तपासणी केली असून ते मजबूत असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

महालक्ष्मी येथील ब्रीज १९२० साली तर वांद्रय़ाचा ब्रीज १९६१ मध्ये उभारला आहे. त्यामुळे भविष्यात आणखी अपघात घडू नये म्हणून रेल्वे, महापालिका, आणि aआयआयटी मुंबई यांनी शुक्रवारी या दोन ब्रीजचे टॉवर वॅगनच्या सहाय्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यांनी सदर दोन्ही ब्रीज मजबूत असल्याचा अहवाल दिला आहे. रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्या उपस्थितीत हे ऑडिट करण्यात आले.