मुंबई, पुण्यासह चार पालिकांत ११ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक

सामना प्रतिनिधी । मुंबई

नांदेड- काघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक, तसेच बृहन्मुंबई प्रभाग क्र. ११६ भांडुप (प.), पुणे क नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी ११ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी १२ ऑक्टोबर रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

मुंबई महानगर पालिकेतील प्रभाग क्र. ‘११६’, पुण्यातील प्रभाग क्र. २१ अ’ नागपूरमधील प्रभाग क्र. ‘३५-अ’ आणि कोल्हापूरमधील प्रभाग क्र. ‘११’ क ‘७७’ च्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होत आहे. या सर्व ठिकाणी १६ सप्टेंबर २०१७ पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल.