महाराष्ट्र बंदला आळंदी परिसरातून प्रतिसाद

सामना प्रतिनिधी । आळंदी

पुणे नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला आळंदी परिसरातून प्रतिसाद मिळाला. येथील आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आळंदी शहर परिसरात फिरून नागरिक व व्यापारी बांधवाना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. बंद शांततेत पार पडला. आळंदी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आळंदीतील प्रमुख बाजारपेठा ,मंदिर परिसर,नगरप्रदक्षिणा मार्ग,भैरवनाथ चौक परिसर,देहू फाटा परिसरात देखील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, आळंदी पोलिसांनी प्रमुख चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. येथील कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढून घटनेचा निषेध केला. आळंदी पोलीस ठाण्यासमोर आल्यावर पोलिसांना निवेदन दिले. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी निवेदन घेतले. आळंदीतील बंद शांतते पार पडला. या बंदमधून अत्यावश्‍यक सेवा मात्र वगळण्यात आली.

यावेळी रिपाइंचे विश्‍वनाथ थोरात, वाहतुक आघाडीचे पश्‍चिम महाराष्ट्र सचिव संतोष डोळस, रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष संदीप रंधवे, बहुजन समाज पक्षाचे डॉ. निलेश रंधवे, सिद्धार्थ ग्रुपचे अध्यक्ष योगेश रंधवे, भारतीय बौद्ध महासभचे जिल्हा पदाधिकारी काशिनाथ रंधवे, मैनाजी रंधवे, भीमराव थोरात, ज्ञानेश्‍वर बनसोडे, डॉ. मनिषा रंधवे, चेतन रंधवे, अक्षय रंधवे, नामदेव सुरपल्लीकर, आनंद रणदिवे, बाळासाहेब खरात, तात्याबा रणदिवे, सुनिता रंधवे, वंदना सोनवणे, विजया सोनकांबळे, नियती शिंदे आदी उपस्थित होते.