आता राहुल गांधी करणार विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड

68

सामना ऑनलाईन । मुंबई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर कुणाची वर्णी लागणार याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आला आहे. काँग्रेस आमदारांच्या झालेल्या बैठकीत याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा ठराव मांडला होता, आमदार नसीम खान आणि यशोमती ठाकूर यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर गटनेता, विरोधी पक्ष नेते पदासाठी उपनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची नावं चर्चेत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकिच्या निकालानंतर राज्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामधील एका नेत्याची विरोधी पक्ष नेतेपदी निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या