महाराष्ट्राचा संघ चॅम्पियन, दिव्यांग राष्ट्रीय 20-20 स्पर्धा

सामना प्रतिनिधी । तामीळनाडू 

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी क्रिकेटच्या रणांगणात जबरदस्त कामगिरी करीत दिव्यांगाच्या (बहिरे) राष्ट्रीय 20-20 स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. महाराष्ट्राच्या संघाने दिल्लीला जेतेपदाच्या लढतीत 40 धावांनी हरवून झळाळता करंडक पटकावला.

ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन ऑफ डेफ यांच्या मान्यतेने, तेलंगणा राज्य क्रिकेट असोसिएशन ऑफ डेफ यांच्या वतीने, तेलंगणा राज्य सरकार व हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हर्षल जाधव, विराज कोलते, रतनदीप धानू, इंद्रजीत यादव, प्रणील मोरे यांनी महाराष्ट्राच्या जेतेपदात सिंहाचा वाटा उचलला. प्रशिक्षक शरद पाटणे, व्यवस्थापक धीरेन शहा, विवेक मालशे, श्रीराम घाडगे, दीपक जाधव यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्राला अजिंक्य होता आले.