…तर डान्सबारना रोखण्यासाठी अध्यादेश काढू, सरकारवरील टीकेनंतर मुनगंटीवार बोलले

2

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्य सरकारने घातलेल्या काही अटी रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारना परवानगी दिली. त्यामुळे सरकारची पंचाईत झाली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा पूर्ण अभ्यास करून आणि कायदे आणि न्याय विभागाशी चर्चा करून गरज वाटल्यास डान्स बारना रोखण्यासाठी अध्यादेश काढू, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने 2005 मध्ये डान्स बारना ठोकलेले टाळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे उघडले गेले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई आणि इतर काही शहरांमध्ये छम छम सुरू होणार आहे. या सुनावणीवेळी राज्य सरकार आपली बाजू मांडण्यास कमी पडल्याची चर्चा असून समाजातील सर्व स्तरांतून सरकारवर टीका होत आहे. अशा स्थितीत आपल्या सरकारची बाजू सावरण्यासाठी आज सुधीर मुनगंटीलवार यांनी आपली बाजू मांडली.