ठाण्याची खाडी फ्लेमिंगोसाठी राखीव

सामना प्रतिनिधी । मुंबई

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून राज्य सरकारने गॅझेटमध्ये अधिसूचित केले आहे. ठाणे खाडी ही पश्चिमेपासून मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, मांडलेपर्यंत पसरली असून हे सर्व क्षेत्र १६.९ चौरस किलोमीटर क्षेत्रात येत असून हा सर्व परिसर यापुढे फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून ओळखला जाणार असून हे सर्व क्षेत्र मुंबई खारफुटी संवर्धन युनिटखाली येणार आहे. या खाडी क्षेत्रात दरवर्षी अंदाजे ४० हजारांहून अधिक फ्लेमिंगो पक्ष्यांची येथे ये-जा होत असते. हे फ्लेमिंगो अभयारण्य माहुल-शिवडी खाडीपर्यंत करण्याची शिफारस बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने केली आहे.