राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ

सामना ऑनलाईन । मुंबई

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केल्याची घोषणा केली आहे. ही पगारवाढ १ जानेवारी २०१७ पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे ऑगस्टपासून सप्टेंबर पर्यंतचा महागाई भत्ता रोख देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे १६ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ टक्कयांनी वाढ केली आहे. सरकारच्या या वाढीव महागाई भत्त्याचा फायदा ६ लाख निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.

कर्मचाऱ्यांना ऑगस्टपूर्वीचा महागाई भत्ता कशाप्रकारे दिला जाईल हे अद्याप सांगण्यात आले नसून त्यासाठी सरकार लवकरच पत्रक काढणार आहे. पाच महिन्यांपूर्वीच सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्कयांनी वाढ केली होती. आता त्यात ४ टक्कयांनी वाढ करण्यात आली आहे.