ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी डीवायएसपी झाला

1

सामना प्रतिनिधी । मुंबई

तीनदा ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेला पैलवान विजय चौधरी याला अखेर राज्य सरकारने पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदी नियुक्ती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय चौधरीला नियुक्तीपत्र दिले. तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेला विजय चौधरी याला लवकरच सरकारी नोकरी देणार असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिसेंबरमध्ये दिले होते. विधानसभेत विजय चौधरीचे अभिनंदन करताना दिलेले हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी चार महिन्यांनंतर पूर्ण केले आहे.

विशेष म्हणजे डिसेंबरमध्येच विजय चौधरीला शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. त्यामुळे कुठल्याही शिफारशीशिवाय आठवडाभरात विजय चौधरीला नोकरी मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले होते, मात्र अनेक महिने उलटूनही विजय चौधरीला सरकारी नोकरी मिळत नव्हती. मंत्रालयाच्या चकरा मारूनही त्याच्या पदरी अपयश येत होते. त्याबद्दल त्याने खंतसुद्धा व्यक्त केली होती.