शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा; विरोधक राज्यपालांना भेटणार

1

सामना ऑनलाईन, मुंबई

शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षयात्रा काढल्यानंतर आता विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत.

शिष्टमंडळामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप कळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार जयंत पाटील, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे आदींचा समावेश असेल.