पुण्यात अपघात; १ ठार, ५ गंभीर जखमी

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यात अप्पर इंदिरानगर भागात झालेल्या विचित्र अपघातामध्ये पाच-सहा वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आणि पाचजण गंभीर जखमी झाले. पुणे महापालिका परिवहन महामंडळाच्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आधी पीएमपीएमएलच्या बसचा ब्रेक निकामी झाला नंतर बस आणि एका शीतपेय वाहून नेणाऱ्या ट्रकची धडक झाली. नंतर मागून मागून येणाऱ्या दोन मोटारसायकली एकमेकांवर धडकल्या. अपघात झाला त्या ठिकाणी उतार असल्याने वाहनांवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे मागून येणारी आणखी दोन-तीन वाहने एकमेकांवर आदळली.