ट्रान्स हार्बरची वाहतूक ठप्प

सामना ऑनलाईन। ठाणे

कोपरखैरणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रान्स हार्बरची वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. ठाणे स्थानकावर तोबा गर्दी झाली असून सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर पडणाऱ्यांचे मात्र हाल झाले आहेत.

रविवारी सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक असल्याने नागरिकांनी दुपारी घरात राहणेच पसंत केले होते. मात्र ऐन गर्दीच्या वेळी पाच वाजता कोपरखैरणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. यामुळे वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.