मंत्रालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड; कामकाज ठप्प

सामना ऑनलाईन । मुंबई

मंत्रालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं कामकाज ठप्प झालं आहे. राज्य सरकारच्या वेबसाईटवरही यांचा परिणाम झाला असून तीही बंद पडली आहे. गेल्या २ तासांपासून सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या ऑनलाईन सेवांवर त्याचा परिणाम झाला आहे. बिघाड दुरुस्तीचं काम सुरू असून लवकरच कामकाज पूर्ववत करण्याच प्रयत्न केला जात आहे.