चार दिवसानंतर शुध्दीत येताच मेजरने विचारले,‘दहशतवाद्यांचे काय झाले?’

सामना ऑनलाईन। श्रीनगर

सैन्यात भरती होणं हे काही येड्या गबाळ्याच काम नाही त्यासाठी देशप्रेमाबरोबरच जिगर लागतं असं आपण कायम बोलतो हेच जम्मू-कश्मीरमधील सुंजवान येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मेजर अभिजित यांनी नुकतंच दाखवून दिलं आहे. तब्बल चार दिवसांनतर शुध्दीवर येताच त्यांनी ‘दहशतवाद्यांचे काय झाले? हा प्रश्न विचारला. त्यांच्या या प्रश्नाने डॉक्टरही क्षणभर चक्रावले. कारण चार दिवसानंतर शुध्दीत आलेली व्यक्ती सहसा आप्तस्वकियांबदद्ल चौकशी करते. पण अभिजित यांनी देशालाच सर्वस्व मानल्याने शुध्दीत येताच त्यांनी दहशतवाद्यांबद्दल विचारुन आपल्या नसानसात देशप्रेमच भिनल्याचे दाखवून दिले.

सुंजवान दहशतवादी हल्ल्यात अभिजित गंभीर जखमी झाले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची शुध्द हरपली होती. चारदिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारांना ते प्रतिसाद देत होते. मात्र शुध्दीत आले नव्हते. यामुळे डॉक्टरही चिंतेत होते. अखेर त्यांना शुध्द आली आणि त्यांनी पहिला प्रश्न दहशतवाद्यांबद्दलच प्रश्न विचारला. त्यानंतर त्यांनी माझी प्रकृती उत्तम आहे. मी डॉक्टरांशी बोलू शकतो याचे समाधान असल्याचे सांगितले. तसेच दिवसातून दोनदा फिरायला मिळतय म्हणजे माझी प्रकृती सुधरत असल्याच एएनआयला सांगितलं. तसंच गेल्या चार दिवसात काय घडलं हे मात्र ठाऊक नाही असेही ते म्हणाले.