मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्याशेजारील ज्ञानेश्वर बंगल्याला आग

28


सामना ऑनलाईन । मुंबई

मलबारहिल मध्ये मुख्यमंत्र्यांचे निवास स्थान असलेल्या वर्षा बंगल्याशेजारील ज्ञानेश्वर बंगल्याला आग लागली आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. आग भीषण असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

गेल्या दोन दिवसांत मुंबईतील आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. रविवारी कुर्ल्यात नेहरूनगर परिसरात पार्क असलेल्या दोन बसला आग लागली होती. आज मुलुंडमध्ये दोन सिलिंडरच्या स्फोटामुळे एका झोपडपट्टीत आग लागली होती. आता मुंबईच्या मलबारहिल या उच्चभ्रू परिसरात आग लागली आहे. ज्ञानेश्वर बंगल्याची आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या